Anand Nirgudkar यांचा राजीनामा सरकारनं लपवला, Uddhav Thackeray यांचा गंभीर आरोप
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूर येथे सुरू असून आज अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होणं अपेक्षित होतं. मात्र या चर्चेपूर्वीच राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी मागासवर्ग आयोगाचा राजीनामा दिलाय... आयोगाच्या कामकाजात २ मंत्र्यांचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत निरगुडे यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळतेय.. निरगुडे यांचा राजीनामा राज्य सरकारने स्वीकारलाय.. दरम्यान मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्याने मागासवर्ग आयोग बरखास्त होणार का अशी चर्चा सुरू आहे.