Uddhav Thackeray On Adani : अडाणी काही माझे शत्रू नाही पण जो मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू-उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray On Adani : अडाणी काही माझे शत्रू नाही पण जो मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू-उद्धव ठाकरे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Party) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सध्या राजधानी दिल्लीच्या (Delhi) दौऱ्यावर आहेत. आज उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. अनेक नेत्यांनी ठाकरेंच्या भेटीसाठी हजेरी लावली आहे. काँग्रेस (Congress) नेते दिग्विजय सिंह (Digvijaya Singh) यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. तर काँग्रेस खासदार कल्याण काळे, याशिवाय समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल यादवांचे पुत्र आणि खासदार आदित्य यादवांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. तसेच, सांगलीचे खासदार विशाल पाटील आणि काँग्रेस आमदार विश्वजीत कदम उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचले. काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मंगळवारी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर आज शरद पवार, शाहू महाराज आणि उद्धव ठाकरेंची भेट होणार आहे. तर उद्या (गुरुवारी) संध्याकाळी 5 वाजता उद्धव ठाकरे सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola