Uddhav Thackeray : उमेदवार कुणीही असो, पण तुमची तयारी असू द्या- उद्धव ठाकरेंचं पदाधिकाऱ्यांना सांगणं
उद्धव ठाकरे यांनी आज सोलापूर माढा आणि परभणी या तीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. परभणी साठी विद्यमान खासदार बंडू जाधव हेच शिवसेना ठाकरे गटाची उमेदवार राहणार आहेत. इंडिया आघाडीतील जागावाटपात सोलापूर आणि माढा हे मतदारसंघ ठाकरे गटाला सुटले तर संभाव्य उमेदवार तयार ठेवण्यात आले आहेत. सोलापुरातून माजी आमदार उत्तम खंदारे आणि माढ्यातून लक्ष्मण हाके यांना तयारी करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. महत्त्वाचं म्हणजे निवडणूका केव्हाही लागतील, त्यामुळे उमेदवार कुणीही असो, पण तुम्ही तयारी असू द्या असं उद्धव ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना म्हणाले.
Tags :
Solapur Madha Parbhani Lok Sabha Candidates Review Former MLA Incumbent Shiv Sena : Uddhav Thackeray INDIA Alliance Potential Candidates