Uddhav Thackeray Meet Rahul Narvekar : फडणवीसांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे राहुल नार्वकरांच्या भेटीला
Uddhav Thackeray Meet Rahul Narvekar : फडणवीसांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे राहुल नार्वकरांच्या भेटीला
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज नागपूरला भेट दिली. त्यावेळी, आयोजित पत्रकार परिषदेतून त्यांनी राज्याती महायुती सरकारवर आणि महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर देखील टीका केली. त्यामुळे, अधिवेशनात उद्धव ठाकरेंचे आमदार झंझावात दाखवणार असे संकेतच त्यांनी दिले होते. मात्र, काही वेळातच उद्धव ठाकरे हे पुत्र आदित्य आणि काही आमदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला त्यांच्या दालनात पोहोचले. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करण्यासाठी ही सदिच्छा भेट होती. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची देखील ठाकरे पिता-पुत्रांनी भेट घेतली. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.