UBT Shivsena Hambarda Morcha : शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ठाकरेंचा 'हंबरडा मोर्चा', सरकारला सवाल
Continues below advertisement
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 'हंबरडा मोर्चा' काढला. या मोर्चात, 'अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या', अशी प्रमुख मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यासोबतच शेतकऱ्यांसाठी सरसकट आणि संपूर्ण कर्जमुक्ती, पीक विम्याचे जुने निकष पुन्हा लागू करणे, तसेच घरं आणि पशुधनाच्या नुकसानीची भरपाई निकष शिथिल करून देण्याची मागणीही करण्यात आली. क्रांती चौकातून सुरू झालेला हा मोर्चा गुलमंडी चौकात सभेत रूपांतरित झाला. या मोर्चाला खासदार संजय राऊत (Sanjay Raut), शिवव्याख्याते राजेंद्र महाराज सावंत आणि इतर नेत्यांनी संबोधित केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement