Thackeray vs Shah: 'मुंबई गिळायला आलेल्या Anaconda चं पोट फाडून बाहेर येऊ', उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर घणाघात
Continues below advertisement
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपशाखाप्रमुखांच्या मेळाव्याला संबोधित करताना भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. 'मुंबई गिळायला आलेल्या त्या Anaconda चं पोट फाडून बाहेर आलो नाही, तर नावाचा नाही,' असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. मुंबईतील भाजपच्या नवीन कार्यालयाच्या भूमिपूजनावरून त्यांनी हल्लाबोल केला. मुंबई गिळण्याचा हा डाव असून, दोन व्यापाऱ्यांचा शहरावर डोळा असल्याचा आरोपही त्यांनी केला. घराणेशाहीच्या टीकेला उत्तर देताना ठाकरे म्हणाले की, 'आम्ही आमच्या आई-वडिलांचे ऋण मानणारे आहोत, तुमची ब्रह्मचार्याची पिलावळं आमची घराणेशाही नाहीये.' आदित्य ठाकरेंच्या वरळीतील कामाचा उल्लेख करत, हेच काम संपूर्ण महाराष्ट्रात करायचे आहे आणि त्याची सुरुवात मुंबईपासून होईल, असेही ते म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement