Uddhav Thackeray : विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी ठाकरे कोकणात; कणकवलीत जाहीर सभा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUddhav Thackeray : विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी ठाकरे कोकणात; कणकवलीत जाहीर सभा. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची सभा सायंकाळी सहा वाजता राणेंच्या बालेकिल्ल्यात कणकवलीत होत आहे. या सभेच्या पार्श्भूमीवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. राणेंनी उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्गात येऊन आमच्या नेत्यांवर टीका केल्यास जाण्याचा मार्ग कुठून जातो हे दाखवू असं वक्तव्य केलं होत यावर उद्धव ठाकरे सभेनंतर दोन तास कणकवलीत असणार आहेत त्यावेळी राणेंनी काय ते करावे वैभव नाईक म्हणाले. तर शरद पवारांनी पक्षातून काढल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षात स्थान दिलं त्याच्यासोबत गद्दारी केली त्यामुळे तुम्हाला आमचं सगळ चुकीचं वाटत, मात्र विकासाची काम दीपक केसरकर यांनी केली नाहीत. आश्वासनाची पूर्तता केसरकर करू शकले नाही. राज ठाकरे स्वतःचे उमेदवार नाहीत, ते दुसऱ्याच्या प्रचाराला येत आहेत. मात्र उद्धव ठाकरे स्वताच्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराला येत आहेत. अमित शहा यांच्या सभेला आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेला किती गर्दी होणार हे सभा झाल्यानंतर कळेल असा टोला वैभव नाईक यांनी अमित शहा यांच्या सभेवर लगावला आहे.