Uddhav Thackeray at Congress Program : उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेस पक्षाचं उपरणं ; चर्चाच चर्चा

Continues below advertisement

Uddhav Thackeray in Congress Program : उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेस पक्षाचं उपरणं ; चर्चाच चर्चा

मुंबई : मुंबई काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राजीव गांधी सद्भावना दिवस कार्यक्रमात आज वेगळंच चित्र पाहायला मिळालं. या कार्यक्रमात आलेल्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या गळ्यात काँग्रेसचे उपरणं असल्याचं दिसलं. काही वेळाने उद्धव ठाकरेंनी गळ्यातील उपरणं बाजूला काढलं आणि स्पष्टीकरणही दिलं. काँग्रेसचे उपरणं गळ्यात घातल्याचा माझा फोटो येईल, त्यासाठीच मी ते घातलेलं असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

नेमकं काय घडलं? 

काँग्रेसच्या आजच्या सद्भावना दिवस कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेस पक्षाचे उपरणं घातलं. काही वेळ ते उपरणं उद्धव ठाकरेंनी तसंच ठेवलं. पण नंतर शरद पवारही त्या कार्यक्रमात आले. सुरूवातीला शरद पवारांनी काँग्रेसचे उपरणे घालण्यास नकार दिला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही त्यांच्या गळ्यातील उपरणं काढलं आणि बाजूला ठेवलं. 

त्यावेळी काँग्रेसचे आमदार भाई जगतापांनी ते उपरणं गळ्यातच ठेवावं असा आग्रह उद्धव ठाकरेंना केला. मात्र उद्धव ठाकरे यांनी हसत हसत त्याला नकार दिला. मात्र संजय राऊतांनी त्यांच्या गळ्यातील उपरणं कायम ठेवलं.  काही वेळाने शरद पवारांनीही काँग्रेस पक्षाचं उपरणं गळ्यात घातलं. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram