Thackeray Alliance | उद्धव ठाकरे यांचा MNS युतीला हिरवा कंदिल? स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी सूचना

उद्धव ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर MNS च्या युतीबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. पदाधिकाऱ्यांना एकत्रित आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक पातळीवर MNS च्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समन्वय ठेवण्याचे निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले असल्याची सूत्रांची माहिती आहे. बैठकीच्या माध्यमातून दोन्ही पक्षाच्या आढावा बैठका घेऊन आपली तयारी पूर्ण ठेवा अशा पद्धतीचं मार्गदर्शन पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी केल्याचं कळतंय. बदलापूर, कल्याण पश्चिम, भिवंडी, अंबरनाथ येथील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी हे निर्देश दिले. मातोश्रीवर ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी हे सूचक वक्तव्य केले. दुसरीकडे, राज ठाकरे यांनी देखील अंबरनाथचा दौरा करून पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्र लढणार का, या चर्चांना उधाण आले आहे. "स्थानिक पातळीवरती MNS च्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समन्वय ठेवा" असे निर्देश देण्यात आले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola