Uddhav Thackeray Full Speech : बाबरी, हिंदूत्व ते फडतूस; नागपुरात उद्धव ठाकरे यांचं झंझावाती भाषण
Uddhav Thackeray Full Speech : बाबरी, हिंदूत्व ते फडतूस; नागपुरात उद्धव ठाकरे यांचं झंझावाती भाषण
देशातील गल्लीबोळात घराणेशाही बोलणाऱ्या गृहमंत्र्यांना समाजसेवा करणाऱ्या घराण्यासमोर झुकावं लागलं. आप्पासाहेब धर्माधिकारींचे काम मोठं आहे. ते व्यसनमुक्तीचे काम करतात. दारूची नशा घर उद्ववस्त करते, सत्तेचे व्यसन देश उद्धवस्त करते. निवडणुकीआधी आघाडी होते आणि त्यांची सभा होते. पण या मविआच्या सभा या सत्तेनंतर सुरू आहेत. आम्ही कारभार व्यवस्थित केला नसता तर तुम्ही सभांना प्रचंड प्रतिसाद दिला नसता. राज्यात अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांमध्ये आक्रोश असताना मुख्यमंत्री हे देवदर्शनाला गेले. पंचनामा करायला अधिकारी जात नव्हते. आम्ही सातत्याने राम मंदिरासाठी कायदा तयार करावा, अशी मागणी केली होती. त्यावेळी मोदी सरकारकडून कोणतीही भूमिका घेतली गेली नाही. राम मंदिराच्या कायद्याबाबत शांत बसले होते. राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर श्रेयासाठी टिकोजीराव फणा काढून बसले. आम्ही घरात बसून चांगलं काम केले. राज्याच्या मुख्यमंत्र्याचे नाव सर्वोत्कृष्ट पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीत होते. नुसतं वणवण फिरला म्हणजे काम करतो, असे होत नाही.