Uddhav Thackeray Full PC : भाजप आणि उर्मट नेते महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करत आहेत
Uddhav Thackeray Full PC : भाजप आणि उर्मट नेते महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करत आहेत
हेही वाचा :
मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहे. मुळे त्यांना कोणीही भेटू शकतं. परंतु हे चित्र बघितल्या नंतर, अगदी टोकाची टीका करणारे, एकमेकांना संपवण्याची भाषा करणारे, आणि जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे तसेच भाजप आणि महायुतीच्या नेत्यांना सरकार आल्यावर तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे हेच लोक होते हे जगजाहीर आहे. लोकसभेत मिळालेल्या विजयानंतर हे लोक एवढे हूरळून गेले होते यांनी विधिमंडळाच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही केला होता. तेव्हा आम्ही तुम्हाला जेल मध्ये टाकू असेही बोलले होते. मात्र अलीकडे त्यांच्यात अमुलाग्र बदल दिसून आला ही चांगली बाब असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. काल( 17 डिसेंबर ) शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Meet) यांची विधानभवन परिसरात भेट घेतली. या भेटीवर एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरेंची मागणीच खऱ्या अर्थाने हास्यास्पद
निवडणूक आयुक्त देखील निवडणुकीद्वारे निवडून आणावे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. तर ही मागणीच खऱ्या अर्थाने हास्यास्पद आहे. तशीच ती घटनेला आव्हान देणारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने हे सर्व निर्णय घेतलेले आहे. म्हणुन एक प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा अवमान आहे. शासकीय यंत्रणा या घटनात्मक पद आहेत. मात्र जेव्हा तुमच्या बाजूने निकाल लागतो त्यावेळेस तुम्हाला त्यावर हरकत नसते मात्र तोच निकाल विरोधात गेला तर त्यावर आक्षेप घेणं हे योग्य नाही. हा बाबासाहेबांचा आणि राज्यघटनेचा अपमान असल्याचे मतही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.