Thackeray's Regret: 'अनंत तरेंनी इशारा दिला होता, पण ऐकलं नाही याचा पश्चाताप होतोय' - उद्धव ठाकरे

Continues below advertisement
ठाण्यातील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. दिवंगत शिवसेना नेते अनंत तरे यांच्यावरील 'अनंत आकाश' या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. 'तेव्हाच जर का अनंत तरे यांचं ऐकलं असतं तर आत्ता अमित शहांच्या चरणी लोटांगण घालून वाचवा, वाचवा म्हणून हंबर्डा फोडणारी माणसं दिसली नसती', असा घणाघात ठाकरेंनी केला. अनंत तरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याविषयी आपल्याला आधीच सावध केले होते, पण त्यांचे ऐकले नाही याचा पश्चाताप होत असल्याचे ठाकरे म्हणाले. तरे यांनी 'हाच उद्या आपल्याला दगा दिल्याशिवाय राहणार नाही' असे म्हटल्याची आठवणही त्यांनी करून दिली. यासोबतच, ठाकरेंनी शिंदेंच्या हेलिकॉप्टर प्रवासावरूनही टीका केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola