Uddhav Thackeray On Sambhajiraje : आम्ही शेण खाल्लं असेल, म्हणून तुम्ही खाताय का? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल!

Continues below advertisement

Uddhav Thackeray On Sambhajiraje : आम्ही शेण खाल्लं असेल, म्हणून तुम्ही खाताय का? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल!  येत्या 14 मे रोजी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. त्याआधी या मतदारसंघात आरोप-प्रत्यारोपाचे पेव फुटले आहे. या जागेवर महायुतीकडून संजय मंडलिक उभे आहेत. तर महाविकास आघाडीने छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी दिलीय. दरम्यान, महायुतीला कात्रीत पकडण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) पक्षाने राज्यसभेचा मुद्दा बाहेर काढला होता. राज्यसभा निवडणुकीवेळी शिवसेनेने (तेव्हाची अविभाजित शिवसेना) संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली नाही. मग आता का राजघराण्याचा पुळका आला, असा सवाल शिवसेनेचे उदय सामंत यांनी केला. यावरच आता शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत भाष्य केलं आहे. मी चुकलो असेन तर संभाजीराजे यांची माफी मागतो, असं ठाकरे म्हणाले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram