Marathi News | 'मराठी शक्तीसमोर सरकारची हिंदी सक्ती हरली' - उद्धव ठाकरे
हिंदी सक्तीच्या विरोधातील मोर्चा रद्द करून ५ जुलैला 'विजयी मोर्चा' काढण्यात येणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 'मराठी शक्तीसमोर सरकारची हिंदी सक्ती हरली' असे त्यांनी म्हटले. मराठी माणसांना एकत्र येण्यासाठी संकटाची वाट पाहू नये असे सांगून त्यांनी मनसेशी मोर्चापलीकडे युती ठेवण्याचे संकेत दिले. पहिलीपासून हिंदी शिकवण्याबाबतचे दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.