Uddhav Thackeray : ठाकरे गटाचं मुंबईत शिबिर, उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर होणार शिक्कामोर्तब

Continues below advertisement

शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापनदिनानिमित्त ठाकरे गटानं आज शिबिराचं आयोजन केलं आहे. वरळीतील NSCI इथं हे मोठं शिबिर पार पडणार आहे.. या शिबिरात नव्या नियुक्त्याही केल्या जाणार आहेत. तसंच, उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदी फेरनिवड केली जाईल. याशिवाय आदित्य ठाकरे आणि अन्य नेत्यांची नेतेपदी निवड करण्यात येणार आहे. अन्य पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या टप्प्याटप्प्याने केल्या जातील... दरम्यान मुंबईत येताच आदित्य ठाकरेंनी शिबीराच्या तयारीची पाहणी केली. मेळाव्याला जवळपास सहा हजार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिबिराच्या शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram