Shinde - Narvekar : राहुल नार्वेकर - एकनाथ शिंदे भेटीवर ठाकरे गटाचा आक्षेप, थेट सुप्रीम कोर्टात धाव
Continues below advertisement
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. त्यावर ठाकरे गटानं तीव्र आक्षेप घेतला आहे. आमदार अपात्रतेचा निकाल उद्या येणार असताना अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना भेटणं कायद्याला धरून नाही, असं प्रतिज्ञापत्र ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात दाखल केलं आहे. निकालाच्या तीन दिवस आधी नार्वेकर शिंदेंना भेटतात, मग तेस पारदर्शक निकाल देतील कशावरून, असा युक्तिवाद या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. प्रतिज्ञापत्रात एबीपी माझा आणि टाईम्स ऑफ इंडियाच्या बातम्यांचा दाखला देण्यात आला आहे.
Continues below advertisement