Mahalaxmi Race Course : महालक्ष्मी रेसकोर्स मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर हलवणार?राजकारण तापण्याची शक्यता
महालक्ष्मी रेसकोर्स मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर हलविण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती मिळतेय. मात्र खासगी जागा संपादित करून रेसकोर्स मुलुंडला नेण्यास ठाकरे गटाचा विरोध आहे. रेसकोर्स हा सरकारी जागेवर व्हायला हवा अशी ठाकरे गटाची भूमिका असल्याचं समजतंय. त्यामुळे आता महालक्ष्मी रेसकोर्सचा मुद्दा तापण्याची चिन्ह आहेत.