Uddhav Thackeray : 'गृहमंत्री नव्हे, गृहकलह मंत्री', उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका

Continues below advertisement
उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधत सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'मी त्यांना गृहमंत्री नाही, गृह कलह मंत्री म्हणतोय, कारण ते घराघरात भांडणे लावतात', अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी सरकारच्या शेतकरी पॅकेजला फसवे म्हटले आणि शेतकऱ्यांनी 'दगाबाज सरकारचा पंचनामा' करावा, असे आवाहन केले. जोपर्यंत संपूर्ण कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत भाजप महायुतीला मतदान करू नका, असेही ते म्हणाले. ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमुक्ती आणि हेक्टरी ५० हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे. तसेच, 'लाडकी बहिण' योजनेतील बदलत्या नियमांवरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले, ज्यामुळे कुटुंबांमध्ये वाद निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola