Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस नसते तर दाढीवाला मुख्यमंत्री असता, ठाकरेंचा गौप्यस्फोट
Continues below advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर पलटवार केला असून, दुसरीकडे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी जमीन घोटाळ्याच्या आरोपांवरून विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना थेट आव्हान दिले आहे. 'तसं पाहिलं तर देवेंद्र पण अॅक्सिडेंटलच आहेत ना?', असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. 'अॅक्सिडेंटल मुख्यमंत्री' या टीकेला उत्तर देताना ठाकरे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. त्याचवेळी, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या जमीन खरेदीच्या गंभीर आरोपांवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. केवळ मीडियात बोलण्याऐवजी रीतसर तक्रार दाखल करावी, तरच चौकशी होईल, असे बावनकुळे म्हणाले. पुणे येथील एका प्रकरणात मीडिया रिपोर्ट्सच्या आधारे सुमोटो कारवाई केल्याचे उदाहरणही त्यांनी दिले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement