Anaconda Politics: 'तुझं पोट फाडून बाहेर आलो नाही तर नावाचा नाही', Uddhav Thackeray यांचा Amit Shah यांना थेट इशारा
Continues below advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राजकारण तापले असून, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. 'अॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची आहे... तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचा नाही,' असा थेट हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर केला. या टीकेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवरच पलटवार केला. तर, भाजप नेत्यांनीही ठाकरे यांना 'घरात बसलेला अजगर' म्हणत त्यांच्यावर टीका केली, ज्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement