Uddhav Thackeray : 'जे घर सोडून फिरतात त्यांना घरातलं दुःख काय कळणार?', मुख्यमंत्र्यांवर हल्ला

Continues below advertisement
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठवाडा दौऱ्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'जे घर सोडून इतर राज्यात फिरतायत त्यांना घरातलं दुःख काय कळणार आहे?', असा थेट सवाल करत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बिहार दौऱ्यावर निशाणा साधला. महाराष्ट्रातील शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री इतर राज्यात फिरत असल्याचा आरोप त्यांनी केला. ठाकरे यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत आणि सरसकट कर्जमाफीची मागणी केली. याचवेळी, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी मीरा-भाईंदरमध्ये कोट्यवधी रुपयांचा भूखंड कवडीमोल भावात घेतल्याचा गंभीर आरोप केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावर पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणी घोटाळ्याचे आरोप झाले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola