Maharashtra Politics: 'ठाकरेंनी ऐकवली फडणवीस, पवारांची ऑडिओ क्लिप, कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण
Continues below advertisement
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठवाडा दौऱ्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, त्याचं काय झालं?', असा सवाल ठाकरेंनी सरकारला विचारला आणि फडणवीस-पवारांची एक जुनी ऑडिओ क्लिप ऐकवून त्यांच्या आश्वासनांची आठवण करून दिली. सध्या मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात सापडला असून, सरकारने केवळ आश्वासनं न देता तात्काळ कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी ठाकरेंनी केली. 'सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत आहे,' असा आरोप करत, जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत 'सरकारला मत नाही' असे फलक गावागावात लावण्याचे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement