Uddhav Thackeray meets Sharad Pawar : उद्धव ठाकरे, संजय राऊतांची सिल्वर ओकवर शरद पवारांसोबत खलबतं
abp majha web team
Updated at:
12 Apr 2023 07:29 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये काल सिल्वर ओकवर जवळपास दीड तास चर्चा झाली. बैठकीला संजय राऊतही उपस्थित होते. गेल्या रविवारी अजित पवार नॉट रिचेबल झाल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, अदानी प्रकरण आणि मोदींच्या डिग्रीवरून राष्ट्रवादी आणि ठाकरे गटात मतभेद निर्माण झाले होते.. त्यावर
पवार आणि ठाकरेंनी चर्चा केली, असं सूत्रांनी एबीपी माझाला सांगितलं. भविष्यात विसंवाद असू नये, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर मविआची एकी कायम राहिली पाहिजे, यावर बैठकीत एकमत झालं.