Thackeray Brothers Unite | ठाकरे बंधूंचा 'पॉलिटिकल परफॉर्मन्स', एका मंचावर 'युनिटी'चा संदेश
प्रवेशाचे महत्त्व राजकारणात आणि नाट्यमंचावरही महत्त्वाचे असते. ठाकरे कुटुंबाचे राजकारण हे नाट्यरंगमंचाच्या अविष्कारावर अवलंबून आहे. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे 'पॉलिटिकल परफॉर्मन्स' घेऊन येत आहेत. मंचावर फक्त दोन भावांसाठी आसन व्यवस्था असणार आहे. दोन्ही पक्ष मिळून 'ना भूतो ना भविष्य' अशी एक 'फ्रेम' देण्याचा प्रयत्न करत आहेत. मंचाच्या दोन्ही बाजूला मोठे 'गेट' दिले गेले आहेत. राज ठाकरे एका बाजूने येतील तर उद्धव ठाकरे दुसऱ्या बाजूने एकाच वेळेला येतील. दोन्ही भाऊ एकत्र 'आय टू आय कॉन्टॅक्ट' करत 'सेंटर स्टेज'मध्ये पोहोचतील. त्यानंतर ते जमलेल्या लोकांना संबोधन करतील आणि अभिवादन करतील. दोघे भाऊ मंचावर येऊन एकमेकांसोबत 'युनिटी', 'एकता' आणि "मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आम्ही एक आलो आहोत" अशा प्रकारचं एक 'फ्रेम' देण्याचा प्रयत्न करणार आहेत. सध्या चार भाषणे ठेवण्यात आली आहेत: प्रकाश शेट्टी, सुप्रिया सुळे, राज ठाकरे आणि शेवटी उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे यांचे भाषण शेवटी असणार आहे, याचा अर्थ राज ठाकरे यांनी आपल्या मोठ्या भावाला मान दिला आहे. राज ठाकरे समारोपाच्या भाषणाआधी बोलतील आणि नंतर समारोप उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने होणार आहे. मंचावर फक्त दोन भाऊ असणार आहेत, तर राखीव जागा मान्यवर आणि इतर पक्षाचे नेते जसे की सुप्रिया सुळे, प्रकाश शेट्टी, महादेव जानकर यांच्यासाठी ठेवली गेली आहे.