Uddhav Thackeray Satyacha Morcha : मतदार यादीतून ठाकरे कुटुंबाचं नाव वगळण्याचा कट?

Continues below advertisement
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मतदार यादीत (Voter List) फेरफार करून नावे वगळण्याचा गंभीर आरोप केला आहे. 'आपल्या डोळ्या देखत लोकशाहीचा खून होतो आहे आणि खून करणारे आपल्या समोर दिमाखाच्या खुर्चीवर बसलेत,' असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी खुलासा केला की, त्यांच्या नकळत २३ ऑक्टोबर २०२५ रोजी 'सक्षम' ॲपवरून (Saksham App) त्यांच्या नावाने बनावट अर्ज करण्यात आला होता, ज्यात खोटा मोबाईल नंबर वापरला होता. निवडणूक आयोगाचे अधिकारी घरी पडताळणीसाठी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. यामागे आपल्या कुटुंबाची चारही नावे मतदार यादीतून काढून टाकण्याचा आणि सिस्टीम हॅक करण्याचा कट असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. जयंत पाटील आणि विजय वडेट्टीवार यांच्या पूर्वीच्या आरोपांचा संदर्भ देत, निवडणूक यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात असल्याचा दावाही त्यांनी केला. जनतेने अशा 'मतचोरांना' लोकशाहीच्या मार्गाने धडा शिकवावा, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola