Uddhav Thackeray on Police : बिनकामाच्या पोलीस आयुक्तांवर करावाई करा, उद्धव ठाकरे संतापले
Uddhav Thackeray on Police : बिनकामाच्या पोलीस आयुक्तांवर करावाई करा, उद्धव ठाकरे संतापले
रोशनी शिंदे यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे, खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आयुक्त कार्यालयात नसल्याने रोशनी शिंदे प्रकरणी चर्चा होऊ शकली नाही. त्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपला संताप व्यक्त केला. उद्धव यांनी म्हटले की, सर्वोच्च न्यायलयाने सरकार नपुंसक असल्याचे म्हटले होते. त्याची प्रचिती ठाण्यात आली. एका महिलेला मारहाण करण्यात आली. त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. इतकंच काय या पीडित महिलेची तक्रार दाखल करून घेतली नसल्याचे उद्धव यांनी म्हटले.