Raj Thackeray Speech : महाराष्ट्रातील शहरं अंबानी आणि अदानींना आंदण म्हणून द्यायचीच- राज ठाकरे

Continues below advertisement
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर (BJP) गंभीर आरोप केले आहेत. संपूर्ण महाराष्ट्र आणि मुंबई शहर अडाणी-अंबानीला (Adani-Ambani) देण्याचा घाट घातला जात असल्याचा दावा त्यांनी केला. ठाकरे म्हणाले, 'तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र, ही महाराष्ट्रामधील सगळी शहरं ही अडाणी अंबानीला आंगण म्हणून द्यायची आहेत.' मुंबई विमानतळाची (Mumbai Airport) जागा अडाणींच्या घशात घालण्याचा मोठा कट रचला जात असल्याचेही ते म्हणाले. त्यांच्या मते, सांताक्रूझ विमानतळावरील ऑपरेशन्स हळूहळू नवी मुंबईत हलवून आणि कार्गो वाढवण बंदरावर (Vadhavan Port) नेऊन ती मोकळी होणारी जागा अडाणींना दिली जाईल. बुलेट ट्रेनच्या (Bullet Train) माध्यमातून तयार होणारा पट्टा, पालघरमधील वस्ती आणि नवीन विमानतळ हे त्याच मोठ्या योजनेचा भाग असल्याचा आरोप ठाकरेंनी केला. 'गुजरातचा वरवंटा' ज्यावेळी महाराष्ट्रावरुन फिरेल, तेव्हा भाजपला मतदान करणारे मराठी मतदारही भरडले जातील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola