Uddhav-Raj Thackeray Meeting | उद्धव-राज ठाकरेंची इनसाईड स्टोरी, भावांमध्ये निवडणुसंदर्भात चर्चा
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात भेट झाली. या भेटीत निवडणुका आणि मुंबईसह इतर महापालिका निवडणुकांवर चर्चा झाली. युतीची चर्चा पुढे नेण्यासाठी दोन्ही पक्ष सकारात्मक असल्याचे दिसून आले. युतीच्या संदर्भातील पुढील रणनीती ठाकरे बंधू ठरवणार आहेत. जागा वाटपाबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडे जबाबदारी देण्यात येईल. "माननीय उद्धव ठाकरे आणि सन्मानीय राज ठाकरे यांच्यामधला संवाद हा जबरदस्त आहे. त्याच्यामुळे कधी काय निर्णय घ्यायचे आणि कधी काय घोषणा करायची हे दोघे मिळून ठरवतील. तुम्ही अजिबात डोक्याला ताण घेऊ नका," असे या भेटीबाबत सांगण्यात आले. राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे, तर काँग्रेस नेते दिल्लीतील वरिष्ठांशी बोलून निर्णय घेणार आहेत. यामुळे महाविकास आघाडीचे भवितव्य काय असेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शरद पवारांचा पक्ष ठाकरे बंधूंच्या युतीच्या बाजूने आहे. काही ठिकाणी ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीसोबत आहे, तर उद्धव ठाकरे काही ठिकाणी मनसेसोबत आणि काही ठिकाणी स्वबळावर लढणार आहेत. स्थानिक पातळीवरील नेते आणि पदाधिकाऱ्यांना विचारात घेऊन मनसेसोबत युती केली जाईल. महाविकास आघाडीसोबत आघाडीची पावले ठाकरे सेना टाकणार आहे.