Voter List Scam : मतदार यादीत घोळ, निवडणुका पुढे ढकलण्याची ठाकरे बंधूंची मागणी
Continues below advertisement
मतदार यादीतील घोळावरून (Voter List Irregularities) राजकारण तापले असून, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एकत्र येत निवडणूक आयोगाची (Election Commission) भेट घेतली आहे. 'आमचा समज आहे की राज्य निवडणूक आयोगाचा सर्वर महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो', असा गंभीर आरोप करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत मतदार यादीतील घोळ सुधारला जात नाही आणि राजकीय पक्षांचे समाधान होत नाही, तोपर्यंत आगामी निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी स्पष्ट मागणी ठाकरे बंधूंनी केली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी टीका करत, 'विरोधकांनी केवळ नरेटिव्ह तयार न करता पुरावे द्यावेत,' असे म्हटले आहे. हयात मतदारांची नावे वगळणे, एकाच घरात अनेक मतदार दाखवणे आणि बनावट मतदार नोंदणी यांसारख्या गंभीर त्रुटींमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement