Uddhav - Raj Thackeray : ठाकरे बंधूंच्या भेटीचा षटकार, युतीची चर्चा पुन्हा जोर धरणार? Special Report
Continues below advertisement
राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात गेल्या तीन महिन्यांतील सहावी भेट पार पडली असून, यावेळी दोन्ही नेत्यांची कुटुंबेही 'मातोश्री'वर स्नेहभोजनासाठी एकत्र आली होती. शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या दाव्यानुसार, 'राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक या पाच महापालिकांबाबत एकमत झालंय'. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात युतीच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. राज ठाकरे यांनी ही कौटुंबिक भेट असल्याचे म्हटले असले तरी, आगामी काळात दोन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे, मनसे नेत्यांनी मात्र युतीबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे, तर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी या भेटीकडे केवळ कौटुंबिक नात्याच्या दृष्टीने पाहावे असे म्हटले आहे. आता ठाकरे बंधू दिवाळीच्या मुहूर्तावर युतीची घोषणा करणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement