Uddhav Thackeray : वाघ असाल तर बंगाल्या वाघीणीसारखं लढा, उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन

Continues below advertisement

Uddhav Thackeray Speech : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त (Balasaheb Thackeray's Birth Anniversary) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. लवकरच महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे शिवसैनिकांना सांगताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीकेचा बाण सोडला. भाजपवर उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली. मी बाहेर पडणार. महाराष्ट्र पिंजून काढणार. जे विरोधक माझ्या तब्बेतीची काळजी घेत आहे, त्या काळजीवाहू विरोधकांनी भगव्याचं तेज दाखवणार. विरोधकांची चिंता करण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी लगावला. भाजपवर टीकेचा बाण ते पुढील आपलं धोरणं काय असेल, यावर उद्धव ठाकरे यांनी आपल्या संबोधनात वक्तव्य केलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram