Udayanraje Bhosale : उदयनराजे राज्यपालांविरोधात आक्रमक, रायगडावर भूमिका स्पष्ट करणार

भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी निर्धार शिवसन्मानाचा या मेळाव्यासाठी साताऱ्याहून किल्ले रायगडच्या दिशेनं कूच केलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी या मेळाव्याचं आयोजन केलं आहे. उदयनराजे हे शनिवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीचं दर्शन घेऊन शिवभक्तांना संबोधित करणार आहेत. त्यासाठी रायगडाच्या पायथ्याशी तयारी करण्यात येत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola