Udayanraje Bhosale | दुसऱ्यांचे हिरावून नको तर आमच्या हक्काचं आरक्षण द्या : उदयनराजे

Continues below advertisement

सातारा : दुसऱ्यांचे हिरावून नको तर आमच्या हक्काचं आरक्षण द्या, अशी मागणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. तसंच काम नसल्याने मराठा समाजातील मुलांची लग्न होत नाहीत, असंही ते म्हणाले. तर मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न होत आहे, त्यामुळे राजकीय अभिनिवेश विसरुन मराठा समाजाने एकता दाखवायला हवी असं भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं आहे. साताऱ्यात आज नरेंद्र पाटील यांच्या अण्णासाहेब पाटील फाऊंडेशनची स्थापना झाली. या कार्यक्रमात भाजप खासदार उदयनराजे आणि भाजप आमदार शिवेंद्रराजे उपस्थित होते. दोन्ही राजेंनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका यावेळी स्पष्ट केली.

"भेदभाव करणं हे लोकप्रतिनिधींच्या पदाला शोभत नाही. समाजाच्या मागण्या काय आहेत याचा विचार केला पाहिजे. दुसऱ्यांचं हिरावून आम्हाला आरक्षण देऊ नका. त्यांना न्याय दिला मग आमच्यावर अन्याय का? एवढं आंदोलन सुरु असताना जाणीवपूर्व केल्यासारखंच दिसून येतं, का ते माहित नाही," असं उदयनराजेंनी यावेळी म्हटलं. तसंच नरेंद्र पाटील यांच्या कामात आम्ही कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram