Udayanraje Bhosale : कितीही शड्डू ठोका; जिल्ह्याचं राजकारण मी आणि शिवेंद्रराजेच करणार
Udayanraje Bhosale : कितीही शड्डू ठोका; जिल्ह्याचं राजकारण मी आणि शिवेंद्रराजेच करणार
नुकत्याच पार पडलेल्या सातारा लोकसभा निवडणुकीच्या चुरशीच्या लढाईत भाजपच्या उदयनराजे भोसले यांनी शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांना पराभवाची धूळ चारली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) या बालेकिल्ल्यात विजय खेचून आणल्यानंतर उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्यामुळे आता उदयनराजे भोसले यांनी आगामी काळात सातारा जिल्ह्याच्या (Satara) राजकारणावर आमचीच पकड राहील, असे सांगत दंड थोपटले. ते शुक्रवारी साताऱ्यातील कोरेगाव येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत शाब्दिक फटकेबाजी केली. आता शिवेंद्रराजे आणि मी एकत्र आलोय. आता मला बघायचे आहे की, जिल्ह्याच्या राजकारणात कोण काय करतंय? कोणीही किती शड्डू ठोका, असे सांगत उदयनराजे भोसले यांनी दंड थोपटत विरोधकांना आव्हान दिले. आता कोणी कितीही शड्डू ठोकले, कोणीही येऊ दे, अगदी वरचा देव जरी आला तरी इथे माझा देव महेश शिंदे, शिवेंद्रराजे, मनोज घोरपडे, अतुल भोसले हे माझ्यासोबत आहेत, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.