Udayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखल
Udayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखल
राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण? यावर एक मत होत नसतानाच, नाशिकमध्ये पालकमंत्री पदासाठी चढाओढ सुरु झाली आहे. मावळते पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि माजी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), गिरीश महाजन (Girish Mahajan) नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी प्रयत्न करत आहेत. दर बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा या पंचवार्षिकमध्ये येत असल्यानं हजारो कोटींची विकासकामे शहरात होणार आहे. त्यानिमित्ताने नाशिकचे नाव जागतिक पातळीवर चर्चिले जाणार असल्यानं नाशिकच्या पालकमंत्रीपदाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. नाशिक विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर प्रत्येक पक्ष आणि मातब्बर नेते आपापल्या पद्धतीने वजनदार मंत्रिपदासाठी लॉबिंग करत आहे. नाशिक जिल्ह्यातील 15 पैकी महायुतीने 14 जागा लढविल्या होत्या आणि सर्व जागा विजयी झाल्यानं सर्व पक्षाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मुंबई, पुणे पाठोपाठ महत्वाचे शहर म्हणून नाशिककडे बघितले जात असल्याने नाशिकचा पालकमंत्री होण्यासाठी कायमच रस्सीखेच बघायला मिळते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारच्या काळात छगन भुजबळ यांनी नाशिकचे पालकमंत्री भूषविले आहे. 2014 मध्ये फडणवीस सरकारच्या काळात गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्री पदाची सूत्र देण्यात अली होती. याच काळात नाशिकमध्ये कुंभमेळा भरला होता. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली कुंभमेळा सुनियोजितपणे पार पडला होता. त्यामुळे शिंदे सरकारच्या काळातच देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांच्यावर आगामी 2027 च्या कुंभमेळाची जबाबदारी दिली आहे.