Uday Samant will meet Sharad Pawar:Ratnagiri Refineryबाबत उद्योगमंत्री उदय सामंत शरद पवारांना भेटणार
बारसूमधील रिफायनरीवर चर्चा करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आज शरद पवारांना भेटणार आहेत.. सकाळी १०च्या सुमाराला मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर इथं ही भेट होणार आहे.. भेटीनंतर शरद पवार माध्यमांसमोर आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे. दरम्यान, काल बारसूतील आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पवारांनी सामंतांना फोन करुन आंदोलकांना सोडून देण्याची मागणी केली होती.. त्यानंतर सामंतांनी मुख्यमंत्र्यांशी बोलून चर्चा करण्याचं आश्वासन दिलं होतं.