Tata Air Bus : राज्यातील प्रकल्प फक्त गुजरातला जातायत, जंयत पाटील-उदय सामंत आमने-सामने
Continues below advertisement
Uday Samant : नागपूरला होणारा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प आता गुजरातमधील (Gujarat) वडोदऱ्याला होणार आहे. या मुद्यावरुन सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. टाटा एअरबसचा ( Tata-Airbus) प्रकल्प नागपुरात आणण्यासाठी मी प्रयत्न करतो असं म्हटलो होतो, प्रयत्न करणं हे काय पाप होऊ शकत नाही. दरम्यान, जो शब्द मी माझा कट्ट्यावर दिला होता, त्याच्याशी मी आजही ठाम असल्याचे सामंत म्हणाले. भविष्यात वेदांता किंवा टाटा एअरबसपेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणणार आहे. त्यामुळं बेरोजगारी दूर होण्यास मदत होईल असे सामंत म्हणाले.
Continues below advertisement