Uday Samant : माऊलींच्या इंद्रायणीचं पावित्र्य धोक्यात, नदीबाबत सकारात्मक पावलं उचलणार - उदय सामंत

Continues below advertisement

Uday Samant  : माऊलींच्या इंद्रायणीचं पावित्र्य धोक्यात, नदीबाबत सकारात्मक पावलं उचलणार - उदय सामंत

माऊलींच्या इंद्रायणीचं पावित्र्य धोक्यात, उदय सामंत म्हणले, नदीबाबत सकारात्मक पावलं उचलणार
नागपूर:  पुण्यातील देवाच्या आळंदीतील (Alandi) इंद्रायणी नदी प्रदुषणाबाबत (Indrayani Pollution)  विधानसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर सरकारने   इंद्रायणी नदीबाबत सकारात्मक पावले उचलणार असल्याची ग्वाही  दिली आहे.  इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करणार,अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.  मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात आदेश दिल्याची माहिती सामंत यांनी दिली आहे.  आमदार महेश लांडगे यांनी या संदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. आमदार महेश लांडगे यांच्या लक्षवेधीस उत्तर देताना मंत्री सामंत यांनी ही ग्वाही दिली आहे. 

इंद्रायणी नदीच्या काठावरती बेकायदेशीर कत्तलखाने आहेत. ⁠रात्री जनावरांची कत्तल केली जाते ते सर्व नदी पात्रात सोडलं जातं. वारकरी त्याच इंद्रायणी नदीच पाणी तिर्थ म्हणून घेतात ⁠हे थांबणार आहे का? असा सवाल दिलीप मोहिते पाटील यांनी केला.  यावर उत्तर देताना उदय सामंत  म्हणाले,   इंद्रायणी नदी प्रदूषणाबात तीन ते चार वर्षे चालेल असे काम सुरु आहे. डीपीआर तीन महिन्यात ठरवून निविदा काढली जाईल. अनधिकृत गोदामामधील घाण पाण्याची तपासणी केली जाईल तसे आदेश पर्यावरण विभागास दिले जणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram