
Uday Samant Speech:पक्षाचे हात बळकट होणार असतील तर कॉम्प्रमाईज करायला तयार Rajan Salvi Join ShivSena
Continues below advertisement
Rajan Salvi : भाई (एकनाथ शिंदे) मुख्यमंत्री असताना मी त्यांच्यासोबत काही परिस्थितीमुळं जाऊ शकलो नाही याचं मला दुःख असल्याचे मत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी व्यक्त केलं. कोणी म्हणतं मला विधानपरिषद देणार, महामंडळ देणार, मला काही नको. मला सगळं मिळालं आहे असेही साळवी म्हणाले. एक लहान भाऊ तुमचा पाठीमागे राहिला होता असेही राजन साळवी म्हणाले.
आपल्या पक्षात आलो याचा आनंद
मी पक्ष सोडून आपल्या पक्षात येत आहे, याचा एक आनंद आहे. तुम्ही कुटुंबात सामावून घेतल याचाही मला आनंद असल्याचे मत 9 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा वाढदिवस होता. त्यादिवशी माझाही वाढदिवस होता. त्यादिवशी मी एकनाथ शिंदे यांना भेटून म्हणालो होतो की मला तुमच्या कुटुंबात यायचं आहे. एक लहान भाऊ तुमचा पाठीमागे राहिला होता असेही राजन साळवी म्हणाले.
Continues below advertisement