Uday Samant : विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार
Continues below advertisement
विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. नितीन बानगुडे पाटील यांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत दिली. भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द झालंय. या पार्श्वभूमीवर आम्हालादेखिल न्याय मिळेल असं सामंत यांनी म्हटलंय. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री यांच्याशी चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ, असं सामंत म्हणाले.
Continues below advertisement