Maharashtra : Kankavli नगरपंचायत निवडणुकीवर Uday Samant स्पष्टच बोलले, 'प्रस्ताव आला तरी युती नाही'
Continues below advertisement
कोकणातील कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती करण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे. कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून युतीबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि जरी प्रस्ताव आला तरी आम्ही सोबत जाणार नाही, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. 'ठाकरेंच्या शिवसेनेचा युतीचा प्रस्ताव आला तरी सोबत जाणार नाही, बहुतांश ठिकाणी महायुती म्हणूनच एकत्र लढणार,' असे वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. त्यामुळे कोकणातील राजकारणात, विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, दोन्ही शिवसेना गट एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement