Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा आज 12 दिवस असून सरकारने त्यांच्या 12 मागण्या मान्य केल्याचं मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं. मात्र, सरकारने एकही मागणी मान्य केली नसल्याचं सांगत जरांगे पाटलांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. त्याच पार्श्वभूमीवर आता सरकराच्यावतीने मंत्री उदय सामंत (Uday samant) आणि आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारची बाजू मांडली. तसेच, जरांगे पाटलांच्या भाषेवरुन, जसे त्यांचे समर्थक तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक असल्यां सामंत यांनी म्हटले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने मी आणि प्रसाद लाड, आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रशासन, तथा आरक्षण समितीची बैठक घेतली. आत्तापर्यंत मराठा समाजासाठी जे काही काम केले त्यासाठी या बैठक होत्या. मराठवाड्यात 21 हजार 51 जात प्रमाणपत्र दाखले पडताळणी केली असून त्यातील 16,110 दाखले दिले आहेत. त्यामुळे, पडताळणी चुकीची होतेय हा गैरसमज आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले. तसेच, फक्त 2 हजार दाखले प्रलंबित आहेत, तेही लवकरच मिळतील. त्याचा ओबीसी समाजावर काहीही परिणाम होणार नाही, सरकारची भूमिका स्पष्ट आहे, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.