Uday Samant : दिलेला शब्द पाळण्याची शिंदे-फडणवीस-अजित पवार यांच्याच ताकद - सामंत
Continues below advertisement
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महायुती सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे, तसेच यावरून टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर दिले. 'ज्या पद्धतीनं शब्द आपण देतो ती पाळण्याची ताकद शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आहे, मुख्यमंत्री देवेंद्रजींमध्ये आहेत आणि अजितदादांमध्ये आहे,' असे सामंत म्हणाले. पावसामुळे नुकसान झालेल्या भात आणि नाचणी पिकांसाठी सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात आणि त्यांना दिलासा मिळावा यासाठी महायुती सरकार काम करत आहे. जूनपर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने यादी तयार करण्याचे काम सुरू आहे, असेही सामंत यांनी स्पष्ट केले. महायुती सरकार आणि शिवसेना पक्ष म्हणून आम्ही बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे आश्वासन त्यांनी दिले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement