Uday Samant on Narayan Rane : काही नेते पत्रकार परिषद घेऊन बालिश आरोप करतात

Continues below advertisement
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपंचायतीच्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची जाहीर प्रचार सभा कुडाळ मध्ये झाली. यावेळी खासदार विनायक राऊत, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, मुंबई माजी महापौर विश्वनाथ म्हाडेश्वर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विकासाच्या मुद्यावर नारायण राणे यांच्यावर टीका केली तर काल कणकवली झालेल्या हल्ल्यामागे आमदार नितेश राणे असल्याची टीका सर्वांनी केली. यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर हल्ले केले जात असलेल्या सुत्रधाराचे हात छाटून टाकू अस खासदार विनायक राऊत म्हणाले तर पोलीस हल्लेखोरांवर योग्य ती कारवाई करतील असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दाखवला. जिल्ह्यात अनिष्ट प्रवृत्तीला धारा करू नका येणाऱ्या निवडणुकीत जनतेने अश्या अपप्रवृत्ती विचारांच्या लोकांना मतदानातून त्यांची जागा दाखवून द्यावी असं आव्हान माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केलं. तर कुडाळ नगरपंचायत आम्हाला द्या आम्ही विकास करून दाखवू असं आश्वासन आमदार वैभव नाईक यांनी केलं. 
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram