Holi Accident : फुगा अंगावर आला दुचाकीस्वाराचं संतुलन बिघडलं, दुचाकीच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू
होळी साजरी करताना दुसऱ्याचं आयुष्य बेरंग होणार नाही याची काळजी आपण सर्वांनीच घ्यायला हवी... हे अधोरेखित करुन सांगण्याची गरज म्हणजे मुंबई लगतच्या विरारमध्ये घडलेली घटना... होळीचा फुगा मारल्यानं दुचाकीस्वाराचं संतुलन बिघडलं आणि दुचाकीची धडक बसल्यानं सायकलस्वाराचा मृत्यू झाला... ५४ वर्षीय रामचंद्र पटेल असं मृत्यू झालेल्या सायकलस्वाराचं नाव आहे.. होळीसाठी लाकडं घेऊन जाणाऱ्या ट्रकमधल्या मुलांनी मारलेल्या फुग्यामुळं ही दुर्घटना घडल्याचं पोलीस तपासात समोर आलंय..