Mumbai Rail Roko: CSMT आंदोलन: दोन प्रवाशांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Continues below advertisement
मुंबईतील CSMT स्थानकात झालेल्या रेल्वे कर्मचारी आंदोलनामुळे दोन प्रवाशांचा मृत्यू झाला, यावर प्रवासी संघटनेचे सिद्धेश देसाई (Siddhesh Desai) आणि सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष प्रवीण वाजपेयी (Pravin Vajpayee) यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सिद्धेश देसाई म्हणाले, 'ज्यांच्यामुळे दोन प्रवाशांचा मृत्यू झाला त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे'. मुंब्रा येथील अपघातानंतर दोन अभियंत्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले होते. देसाई यांनी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा कायद्याचे (ESMA) उल्लंघन झाल्याचा आरोप केला आणि प्रवाशांना जाणूनबुजून लक्ष्य करण्यात आल्याचे म्हटले. दुसरीकडे, सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष प्रवीण वाजपेयी यांनी सांगितले की, त्यांच्या संघटनेने रेल रोको केला नाही किंवा कोणालाही चिथावणी दिली नाही. या आंदोलनाला परवानगी कशी मिळाली आणि पीक अव्हर्समध्ये रेल्वे प्रशासनाने ते का रोखले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola