Himachal Pradesh मध्ये बर्फवृष्टीमुळे महाराष्ट्रातील दोन गिर्यारोहकांचा मृत्यू

Continues below advertisement

हिमाचल प्रदेश येथील  किन्नोर परिसरात पडलेल्या मोठ्या हिमवर्षावात ट्रेकिंगसाठी गेलेले तिन जणांचा मृत्यू झाला आहे.  तर इतर 14 जणांना रेस्क्यू करण्यात यश आलं . मृत्यू झालेल्या तिघांमध्ये दोन डोंबिवलीकर आहेत  राजेंद्र पाठक (67 वर्षे)  आणि अशोक भालेराव (66 वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. 

राजेंद्र पाठक आणि अशोक भालेराव दोघेही डोंबिवलीचे होते. दोघे लहानपणापासूनचे मित्र होते. दोघांनाही ट्रेकिंगची आवड होती. वयाची साठी ओलांडल्यानंतर देखील ही आवड त्यांनी जोपासली होती. जवळपास 40 वर्ष दोघे एकत्रित ट्रेकिंग करत होते. मात्र हा ट्रेक त्या दोघांच्या आयुष्यातील शेवटचा ट्रेक ठरला. मागील तीन दिवसापासून त्यांचे कुटुंबीय त्यांचा शोध लागला का? याकडे डोळे लावून बसले  होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram