Thane Yeoor Lake Death : ठाण्याच्या येऊर तलावात दोघांचा बुडून मृत्यू, 24 तासात एकाच जागी चार बळी

ठाणे : ठाण्यात (Thane News Update) 24 तासात 4 किशोरवयीन मुलांना पोहण्याच्या मोहापायी जीव गमवावा लागला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे येऊरच्या प्रतिबंधित क्षेत्रात असलेल्या नील तलावात या चौघांना प्राणाला मुकावे लागले आहे. काल 2 जण बुडून मृत पावल्यानंतर आज देखील सकाळी याच तलावात पोहायला गेलेल्या किशोरवयीन मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने जीवाला मुकावे आहे. त्यामुळे या तलावाकडे जाणाऱ्या मार्गांवर पोलीस किंवा सुरक्षा रक्षक नेमावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. येऊरचा हा तलाव (Yeoor lake in Thane) 'मौत का कुंआ' बनलाय असेही म्हटले जात आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola