Chiplun: चिपळून शहरात दोन घटनांत कौटुंबीक वादातून आत्महत्येचा दोघांचा प्रयत्न ABP Majha

Continues below advertisement

चिपळूण शहरात काल दिवसभरात आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या दोन घटना घडल्या. त्यात एकानं तर नगरपालिकेच्या इमारतीवरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. पण पालिकेचे अधिकारी आणि पोलिसांनी त्याला वाचवलं. तर दुसऱ्या घटनेत एका विवाहित महिलेनं इमारतीवरून उडी घेण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच तिला ताब्यात घेतल्यानं अनर्थ टळला. दोन्ही घटना कौटुंबीक वादातून घडल्याची माहिती समोर आलीय. शहरात एकाचवेळी दोन घटना घडल्यानं पोलिसांची तारांबळ उडाली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram