Hingoli :हिंगोेलीत हनीट्रॅपमधून खंडणी वसूल करणाऱ्या दोघांना अटक,आरोपींशी मैत्री करणं महाग पडलं
Continues below advertisement
हिंगोेलीत हनीट्रॅपमधून खंडणी वसूल करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलीय. हिंगोलीच्या बळसोंड गावात राहणाऱ्या तरुणाला या दोन्ही आरोपींशी मैत्री करणं महाग पडलंय. या पीडित तरुणाची वाशिममधील राहुल कांबळे या युवकाशी मैत्री झाली. राहुलने या तरुणाला भेटण्यासाठी वाशिमला बोलावलं,. यावेळी पीडित तरुणाच्या चहामध्ये गुंगीचं औषध टाकून बेशुद्ध केलं. यानंतर महिलेसोबत पीडित तरुणाचा अश्लील व्हीडिओ बनवला. याच व्हीडिओच्या आधारे राहुल कांबळेनं पीडित तरुणाला धमकी देत खंडणीची मागणी केली. आरोपींनी तब्बल ११ लाखांची खंडणी उकळल्याचा समोर आलंय. ही खंडणी देण्यासाठी पीडित तरुणावर स्वतःचं घर विकायची वेळ आली. याप्रकरणी पीडित तरुणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केलीय.
Continues below advertisement